देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज चार लाखांच्या आसपास नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली असून, लॉकाडउन देखील लागू करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ वाजेपर्यंतची देशभरातील राज्यांमधील करोनापरिस्थिती दर्शवणारी आकडेवारी समोर आली आहे. केंद्राने करोनबाधितांच्या संख्येनुसार राज्यांची तीन प्रकारात वर्गवारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या म्हणजे करोनाबाधितांची एकूण संख्या ५,५०,००० पेक्षा अधिक असलेल्या  राज्यांमध्ये आहे.

करोनाचा प्रकोप : देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक बळी

देशात आज (९ मे) सकाळी ८ वाजेपर्यंत १,८३,१७,४०४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३७,३६,६४८ अॅक्टिव्ह केसेस असून, २,४२,३६२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू हे कोमॉर्बिडीटमुळे झालेले आहेत.

०१- ६०००० पर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
चंदीगढ – एकूण करोनाबाधित ४९ हजार ३१२ व मृत्यू – ५५८ , त्रिपुरा – एकूण करोनाबाधित ३७ हजार ५५९ व मृत्यू ४०६, मणिपूर – एकूण करोनाबाधित ३४ हजार ७७५ व मृत्यू – ४६१, अरूणाचल प्रदेश – एकूण करोनाबाधित २० हजार ४६ व मृत्यू ६०, मेघालय – एकूण करोनाबाधित १९ हजार ३०२ व मृत्यू – २१०, नागालँड – एकूण करोनाबाधित १५ हजार ९१३ व मृत्यू १३७, लडाख एकूण करोनाबाधित – १५ हजार १७९ व मृत्यू १५३, सिक्कीम – एकूण करोनाबाधित ९ हजार ६५१ व मृत्यू – १६५, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव – एकूण करोनाबाधित ८ हजार ७३७ व मृत्यू -४, मिझोरम – एकूण करोनाबाधित ७ हजार ५५१ व मृत्यू १७, अंदमान व निकोबार – एकूण करोनाबाधित ६ हजार ३४१ व मृत्यू ७४, लक्षद्वीप – एकूण करोनाबाधित ३ हजार ७५६ व मृत्यू ९

६०००१- ५,५०,००० एकूण कोरनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
हरयाणा – एकूण करोनाबाधित ६,०२,३४९ व मृत्यू ५४५४, बिहार -एकूण करोनाबाधित ५,८०,२१७ व मृत्यू ३२१५, ओडिसा – एकूण करोनाबाधित ५२,४२,०२७ व मृत्यू २१६१, तेलंगण -एकूण करोनाबाधित ४,९२,३८५ व मृत्यू २७०४, पंजाब -एकूण करोनाबाधित ४३,३६,६८९ व मृत्यू १० हजार ३१५, आसाम – एकूण करोनाबाधित २,८९,०६९ व मृत्यू १६२८, झारखंड – एकूण करोनाबाधित २,८२,१७४ व मृत्यू ३७५६, उत्तराखंड – एकूण करोनाबाधित २,३८,३८३ व मृत्यू ३५४८, जम्मू व काश्मीर – एकूण करोनाबाधित २,११,७४२ व मृत्यू २६७२, हिमाचल प्रदेश – एकूण करोनाबाधित १,२८,३३० व मृत्यू १८३०, गोवा – एकूण करोनाबाधित १,१६,२१३ व मृत्यू १६१२, पदुच्चेरी – एकूण करोनाबाधित ७०,०७६ व मृत्यू ९३९

५,५०,००० पेक्षा अधिक एकूण कोरनाबाधित संख्या असलेली राज्ये –
महाराष्ट्र – एकूण करोनाबाधित ५०,५३,३३६ व मृत्यू ७५ हजार २७७, कर्नाटक – एकूण करोनाबाधित १८,८६,४४८ व मृत्यू १८२८६, केरळ – एकूण करोनाबाधित १८,६६,८२७ व मृत्यू ५७४६, उत्तर प्रदेश – १४,८०,३१५ व मृत्यू १५ हजार १७०, तामिळनाडू – एकूण करोनाबाधित १३,५१,३६२ व मृत्यू १५ हजार ४१२, दिल्ली – एकूण करोनाबाधित १३,१०,२३१ व मृत्यू १९ हजार ०७१, आंध्रप्रदेश – १२,६५,४३९ व मृत्यू ८ हजार ६१५, पश्चिम बंगाल – एकूण करोनाबाधित ९,७३,७१८ व मृत्यू १२ हजार २०३, छत्तीसगड – ८,४२,३५६ व मृत्यू १० हजार ३८१, राजस्थान- एकूण करोनाबाधित ७,३८,७८६ व मृत्यू ५ हजार ५०६, गुजरात – एकूण करोनाबाधित ६,६९,९२९ व मृत्यू ८ हजार २७३, मध्य प्रदेश – एकूण करोनाबाधित ६,६०,७१२ व मृत्यू ६ हजार ३३४