News Flash

सुषमा स्वराज यांनी दिलदारपणे मान्य केली होती चूक

भाषणाच्या व्हिडिओसह सुषमा स्वराज यांनी ट्विट केले होते.

माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपातील वजनदार नेत्या सुषमा स्वराज त्यांच्या दिलदारपणामुळे ओळखल्या जायच्या. मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांच्याकडून बोलताना चूक झाली. त्यावर त्यांनी कोणताही कमीपणा न बाळगता माझ्याकडून बोलताना चूक झाली, मी माफी मागते, असे ट्विट केले होते.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशा असंख्य कहाण्या सध्या सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत, मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या. २०१८ मध्ये मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुषमा स्वराज एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेपासून जनकपुरीपर्यंत भारतीयांशी संवाद साधला आहे. त्यावर मोदी यांनी ज्यांना संबोधित केले ते नेपाळी होते. भारतीय नव्हे, असा सूर सोशल मीडियातून उमटला होता.

त्यानंतर २८ मे २०१८ रोजी सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली होती. ही माझ्याकडून चुक झाली आहे आणि यासाठी मी माझी मागते, असे भाषणाच्या व्हिडिओसह सुषमा स्वराज यांनी ट्विट केले होते. कामाचा व्याप कितीही असला तरी सुषमा स्वराज नेहमी ट्विटरवर सक्रिय असायच्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 12:03 pm

Web Title: statement of sushma swaraj for whom he apologized bmh 90
Next Stories
1 राजकारणातलं एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपलं-राज ठाकरे
2 Article 370: कैलास मानसरोवर यात्रेकरुंना चीनने नाकारला व्हिसा
3 स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे पाकमधून भारतात परतलेला तरुण म्हणतो…
Just Now!
X