03 August 2020

News Flash

सीमेवर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली नाही तर भारतही जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार

चीनच्या हेकेखोर भूमिकेमुळे वाढला वाद

संग्रहित छायाचित्र

भारत आणि चीनमध्ये लष्करी, मुत्सद्दी पातळीवर सुरु असलेल्या चर्चेमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव इतक्यात निवळणार नाही, याची सरकारला कल्पना आहे.

“सीमेवरील परिस्थिती आपल्या पद्धतीने हाताळण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे ‘फ्री हँड’ मोकळीक देण्यात आली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर पुरेशा प्रमाणात सैन्य तैनाती, लष्करी साहित्य पोहोचवण्यात आले आहे” असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

चीनच्या हेकेखोर भूमिकेमुळे चर्चेतून काहीही निष्पन्न होत नाहीय. पण चर्चा बंद करायची नाही, ती सुरुच ठेवायची असे दोन्ही बाजूंनी ठरवलेय ती एक चांगली बाब आहे” असे या अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

मुत्सद्दी पातळीवर बिजींगमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. लष्करी पातळीवर लडाखमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सहा आणि २२ जून अशा चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. पण परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्याची भारताची मागणी आहे. पण चिनी सैन्य फिंगर फोर भागातून माघार घ्यायला तयार नाहीय.

‘हा वाद इतक्यात मिटणार नसून दीर्घ संघर्षासाठी भारतही तयार आहे’ असे अधिकाऱ्याने सांगितले. “प्रादेशिक अखंडतेबरोबर भारत सरकार कुठलीही तडजोड करणार नाही. सीमेवरील परिस्थिती बिघडली तर त्याचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे” असे अधिकाऱ्याने सांगितले.

पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी

पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे.

फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरु केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरु केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 8:55 am

Web Title: status quo ante the goal india digs in for long haul dmp 82
Next Stories
1 Good News : १२ दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला
2 चीन नाही सुधारणार, पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी, दक्षिण किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव
3 वर्षाच्या अखेरिस भारताला मिळणार S-400 अ‍ॅडव्हांस्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम
Just Now!
X