उत्तरप्रदेशमधील बांदा येथील एका कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये वेळेवर न आल्यामुळे नोटीस बजावले होते. आणि उशीरा येण्याबाबत स्पष्टीकरण मागवले होते. त्या व्यक्तीने दिलेल्या स्पष्टकरणाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या व्यक्तीने बायकोचे पाय दाबावे लागतात म्हणून ऑफिसला यायला वेळ लागत असल्याचे कारण दिले आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रकूट येथील आयकर विभागामध्ये लिपीक पदावर कार्यरत असलेले अशोक कुमार यांना सतत उशीर येण्यामुले लेटमार्क लावण्यात आला होता. तसेच त्याचे कारण विचारण्यात आले होते. त्यावेळी अशोक यांनी स्पष्टीकरण दिलेले प्रत सध्या व्हायरल होत आहे.
सर, ऑफिसला येण्यापूर्वी मला बायकोचे पाय दाबावे लागतात. सकाळी उठल्यावर घरातील सर्व काम करावे लागते. जेवण तयार करून मुलांना शाळेत सोडावे लागते. त्यामुळे मला येण्यास उशीर होते. असे स्पष्टीकरणाच्या प्रत मध्ये अशोक यांनी म्हटले आहे.

१८ ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त एमएस वर्मा यांनी अशोक यांना नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागवले होते. ‘बायको आजारी असल्यामुळे घरातील सर्व काम करावे लागते. तीन मुले आहेत. त्यांना तयार करून शाळेत सोडावे लागते. तसेच त्यांना सकाळी नाश्ताही तयार करून द्यावा लागतो. सकाळी बायकोला अघोंळ घालून खाऊ घालावे लगाते. हे सर्व काम झाल्यानंतर ऑफिसला येतो. रस्तेही खराब आहेत. त्यात ट्रॅफिक खूप असते म्हणू मला ऑफिसला यायला उशीर होतो. यापुढे उशीर होणार नाही’ असे स्पष्टीकरण अशोक यांनी दिले.

अशोक कुमार यांच्या या स्पष्टीकरणावर सहायक आयुक्त निशब्द झाले. अशोक कुमार यांना पुन्हा अशी चुक करू नका असा समन्स बजावला.