दक्षिणोत्तर छत्तीसगडमधील माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्ह्य़ात शुक्रवारी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान गंभीर जखमी झाला.  चिंटागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जिल्हा पोलीस, छत्तीसगड सशस्त्र दल आणि विशेष दलाच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवली. यावेळी मिनापा गावाजवळ नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे अडीच तास चाललेल्या या चकमकीत दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती बस्तर रेंजचे पोलीस महासंचालक हिमांशू गुप्ता यांनी दिली.