News Flash

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

नक्षलवाद्यांनी जमुई जिल्ह्यात विशेष कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि अन्य दोघे जण जखमी झाले.

| September 20, 2013 02:26 am

नक्षलवाद्यांनी जमुई जिल्ह्यात विशेष कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि अन्य दोघे जण जखमी झाले. नक्षलवाद्यांनी डोंगराच्या माथ्यावरून शुक्रवारी पहाटे जवानांवर निशाणा साधला. जमुई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जितेंदर राणा यांनी ही माहिती दिली. अन्शुकुमार असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून, अजयकुमार आणि सुमनकुमार जखमी झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाची बांधकाम सुरू असलेली इमारत बुधवारी रात्री उडवून दिली. सशस्त्र नक्षलवाद्यांनी पारसी गावातील या इमारतीमध्ये स्फोट घडवून आणले. ही घटना घडल्याचे समजल्यावर पोलीस अधीक्षकांसह अन्य अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी विशेष कृती दलाच्या जवानांनी बारीबाग गावापासून जंगलातील मार्गाने पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी गिधेश्वर डोंगराजवळ नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण तीन जवानांना गोळ्या लागल्या. त्यापैकी एका जवानाचा मृत्यू झाला असून, अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 2:26 am

Web Title: stf jawan killed in maoist attack in bihar
टॅग : Maoist Attack
Next Stories
1 सीरियातील हिंसाचारामागे अल् कायदा पुरस्कृत बंडखोर!
2 तब्बल दोन वर्षांनी नितीशकुमारांचा ब्लॉग अपडेट
3 आदर्श घोटाळ्यात सुशीलकुमार शिंदेंना सीबीआयकडून क्लिन चीट
Just Now!
X