पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गचे नाव एफआयआरमध्ये नाहीय, असे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी स्पष्ट केले. पण सुरुवातीला माध्यमांनी दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग विरोधात एफआयआर दाखल केल्याच्या बातम्या दिल्या होत्या. त्यावर ग्रेटाने टि्वट करुन प्रतिक्रिया दिली.

दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याच्या वृत्तानंतर ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. “मी शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही” असे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन: ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला FIR

 

आणखी वाचा- रिहाना पाठोपाठ ग्रेटा थनबर्गची शेतकरी आंदोलनात उडी; ट्विट करून म्हणाली…

ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट केले. भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे तिने म्हटले होते. त्याचवेळी तिने या आंदोलना संदर्भातील सीएनएनचा लेखही शेअर केला होता. रिहानाच्या पाठोपाठ ग्रेट थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.

आणखी वाचा- टि्वटरने घेतली अ‍ॅक्शन, कंगनाचे दोन ट्विट हटवले

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे टि्वट केले होते. रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या टि्वटनंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशात दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल टि्वट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे.