स्टिंग ऑपरेशनमध्ये आम आदमी पक्षाचे नेते बेकायदेशीररीत्या निधी गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उडाली आहे. ही चित्रफीत म्हणजे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा हा कट असल्याचा आरोप पक्षातून करण्यात आला आहे.
आम्हाला त्या मूळ चित्रफिती देण्याबाबत संबंधित संकेतस्थळाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले.
मीडिया सरकार या वृत्तसंकेतस्थळाने आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी कामाच्या मोबदल्यात पैसे घेण्याची तयारी दर्शविल्याचे दाखवण्यात आले आहे. दाखविण्यात आलेल्या चित्रफिती मध्ये काही तांत्रिक बदलही करण्यात आलेले आहेत. हे स्पष्ट लक्षात येते. मूळ चित्रफित मीडिया सरकार संकेतस्थळाने देऊ केलेली नाही. असेही आम आदमी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत चौकशी करण्यासाठी आम आदमी पक्षाने समितीची स्थापना केली असून, त्या संकेतस्थळाच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या स्टिंग ऑपरेशननंतर आम आदमी पक्षाने तातडीची बैठक बोलावली. बैठकीला राजकीय व्यवहार समितीचे सदस्य योगेंद्र यादव आणि संजय सिंह उपस्थित होते. या संदर्भात पूर्ण चौकशी करून पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यामध्ये जमिनीचे व्यवहार आणि इतर कामे आहेत. ही कामे करून घेण्याच्या मोबदल्यात पक्षाला देणगी स्वरूपात मदत करण्याची तयारी असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये आहे. यामध्ये आर.के.पूरम येथील उमेदवार शाझिया इल्मी, कुमार विश्वास यांचा समावेश आहे. शाझिया यांनी या स्टिंग ऑपरेशननंतर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
केजरीवाल यांच्यावर अण्णा नाराज