रमजानचा महिना असल्याने भारताने महिनाभर शस्त्रसंधी पाळली. मात्र पाकिस्तानचे नापाक इरादे जसेच्या तसेच आहेत हेच दिसून येते आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानने केलेच शिवाय जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे आज रमजान ईद असूनही या ठिकाणचे वातावरण काहीसे धुमसतेच राहिले आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग भागातही सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली.

यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडेही फकडवण्यात आले. तसेच जमावही मोठ्या प्रमाणात जमला होता आणि घोषणाबाजी करू लागला होता. त्यामुळे या जमावाला पांगवण्यातठी सुरक्षा दलांनी अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. दोन दिवसांपूर्वीच जामा मशिद भागातही असाच प्रकार घडला होता. गेल्या 4 आठवड्यांपासून दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरीही गेल्या काही दिवसांपासून दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीचे परिणाम अटारी आणि वाघा बॉर्डरवरही बघायला मिळाले या ठिकाणी बीएसएफच्या जवानांनी आणि पाकिस्तानच्या रेंजर्सनी ईदची मिठाईही दिली नाही.