01 December 2020

News Flash

जातीय हिंसाचारांचा ठोस बीमोड करा

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर देशातील सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी जातीय हिंसाचारासारख्या घटनांचा बीमोड

| September 7, 2013 03:45 am

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर देशातील सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी जातीय हिंसाचारासारख्या घटनांचा बीमोड करण्यासाठी ठोस पावले उचला, अशी सूचना केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्यांना केली.
कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना याबाबतच्या सूचना दिल्या. राज्यातील जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना, धार्मिक हिंसाचार टाळण्यात गुप्तचर यंत्रणांची मदत घ्यावी तसेच समाजकंटकांचा योग्य बंदोबस्त करावा, असे सेठ यांनी सर्व राज्यांच्या संबंधितांना सांगितले.
गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या जातीय दंगलींची गंभीर दखल घेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कॅबिनेट सचिवांना याबाबत संबंधितांची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सेठ यांनी केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी आणि अन्य केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. ३१ ऑगस्टपर्यंत देशात ४५१ धार्मिक िहसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तर २०१२ मध्ये अशा प्रकारच्या ४१० घटनांची नोंद झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 3:45 am

Web Title: stop communal violence center suggests to state governments
Next Stories
1 अ‍ॅसिडच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्याची राज्यांना सूचना
2 उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारांचे आज वितरण
3 चॅटिंगमध्ये उशिरा प्रतिसाद देणारे खोटारडे
Just Now!
X