News Flash

विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा

देशाच्या विविध भागात दक्षिण अफ्रि का, ब्रिटनमध्ये आढळणारे करोनाचे विविध प्रकार सापडत आहेत.

 

सर्वेक्षणात ४३ टक्के लोकांचे मतप्रदर्शन 

देशभरात अलीकडे करोना संसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने ब्रिटन आणि दक्षिण अफ्रि के तून येणारी उड्डाणे थांबवावी, अशी सुमारे दोनतृतीयांश लोकांची इच्छा आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय समाजवर्तुळाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून सुमारे ४३ टक्के लोकांनी करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण देशातील २४४ जिल्ह्यांमधील आठ हजार ८०० नागरिकांकडून आलेल्या प्रतिसादावर आधारित आहे.

गेल्यावर्षीपासून वंदे भारत मिशनअंतर्गत आणि जुलैपासून निवडक देशांसोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्थेअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात दक्षिण अफ्रि का, ब्रिटनमध्ये आढळणारे करोनाचे विविध प्रकार सापडत आहेत. दररोज ६० हजार नवे बाधित नोंदवलेजात आहेत. यावर्षी १२ फे ब्रुवारीला १२ हजार रुग्ण होते आणि ४५ दिवसात दररोजच्या प्रकरणातील ही पाचपट वाढ आहे. इंग्लंडमध्ये आढळणारा करोनाचा प्रकार ७० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. तर दक्षिण अफ्रि के त आढळलेला करोनाचा प्रकार ३० च्यावर देशांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर काही निर्बंध घालण्यात यावे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

करोना विषाणूंच्या या प्रकारांना मर्यादा घालण्यासाठी ब्रिटन आणि अफ्रि का येथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालावे, असेही सर्व्हेत म्हटले आहे. बऱ्याच नागरिकांनी विषाणूने भारतात आधीच मोठ्या प्रमाणात प्रवेश के ला आहे. तीन महिन्यातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे भारतात वेगवेगळ्या टप्प्यावर बदल घडले आहेत. आता विमाने बंद के ल्यामुळे नवीन संक्र मण आणि नवीन विषाणू येणार नाही. डिसेंबर २०२० अखेरीस नागरिकांनी व्यक्त के लेल्या मतानुसार ब्रिटन आणि इतर उच्च जोखमींच्या देशातील सर्व उड्डाणे जानेवारी अखेरपर्यंत बंद ठेवायला पाहिजे होती, असे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:20 am

Web Title: stop flights from abroad akp 94
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकू : शहा
2 ध्रुवीकरणाच्या राजकारणावर विश्वास नाही – राजनाथ सिंह
3 ‘होली की शुभकामनाये’ असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मोदींना दिल्या शुभेच्छा
Just Now!
X