सध्या जगातील अन्य अर्थव्यवस्थांच्या वाढीच्या तुलनेत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. वेगाने अर्थव्यवस्था वाढत असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांना देण्यात येणारे आर्थिक अनुदान यापुढे थांबवण्याचा विचार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘अमेरिका देश स्वत: विकसित देश आहे, आणि प्रत्येक देश आपली अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेची अर्थव्यवस्था आधिक वेगाने वाढली पाहिजे. त्यासाठी यापुढे भारत आणि चीनसारख्या वेगाने वाढत असलेल्या देशांना अनुदान देताना विचार करावा लागेल.’

शुक्रवारी फर्गो शहरांमध्ये पक्ष निधीसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी विश्व व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)वरही टीकास्त्र सोडले. ट्रम्प यांच्या मते जागतिक व्यापार संघठनेने चीनला सदस्य बनवून जगातील मोठी आर्थिक ताकद होण्याची मोठी संधी दिली आहे.

ट्रम्प म्हणाले की, ‘ आपण जगातील अविकसीत देशांना अनुदान देतो, ज्यामुले त्यांना विकसित होण्यास मदत होते. पण भारत आणि चीनसारख्या देशांची आर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांमध्ये यांचा विकसित देशांत समावेश होईल, पण हे देश स्वत:ला अविकसित समजतात. त्यामुळे त्यांना अनुदान द्यावे लागते. मात्र वास्तवमध्ये हे देश अविकसित देशांच्या यादीत येत नाहीत. त्यामुळे भारत आणि चीनसारख्या देशांना देण्यात येणारे आर्थिक अनुदान बंद करणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोबत सुरू असलेले व्यापारी युद्ध आणखी प्रखर करण्याचा इशारा दिला आहे. चीनहून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर शुल्क लावण्यासाठी अमेरिका तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. दरम्यान अमेरिकेने येणाऱ्या काळात आयात होणाऱ्या 267 अब्ज डॉलरच्या अतिरिक्त सामानावर देखील शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.