News Flash

किम जोंग उन पुन्हा चर्चेत; करोनाचे नियम मोडणाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी झाडल्या गोळ्या

करोनाबाबत उत्तर कोरियात घालण्यात आलेत कठोर निर्बंध

सध्या जगभरात करोनाचा प्रसार वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी आपल्या देशातील नागरिकांना काही नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. इतकंच नाही तर नियम मोडणाऱ्याला मृत्यूदंडाचीही शिक्षा देण्यात येत आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी करोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीनं नियम मोडल्याचं सांगत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. संबंधित व्यक्तीला फायरिंग स्क्वाडच्या हाती सोपवण्यात आलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. इतकंच नाही तर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार किम जोंग उन यांनी आपल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी चीनच्या सीमनेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तैनात केल्या आहेत. त्याद्वारे एका किलोमीटरपर्यंतही कोणालाही गोळ्या घालता येऊ शकतात.

इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला करोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. नियम मोडत त्या व्यक्तीनं चिनी सामानाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तस्करी करताना त्या व्यक्तीला स्थानिक सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 1:09 pm

Web Title: story kim jong un brutal verdict openly gunned down accused after breaking coronavirus pandemic rule in north korea jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य
2 अरेच्चा! ‘कोवॅक्सिन’चा डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच झाला करोना
3 शेतकरी संसदेला घेरण्याच्या तयारीत; आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
Just Now!
X