News Flash

पायाभूत सुविधा प्रकल्पांना बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरील भाषणात या योजनेची घोषणा केली होती.

पुढील पाच वर्षांमध्ये पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी १०२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्याचा आराखडा केंद्र सरकारने तयार केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीतून विकासाला चालना मिळेल आणि देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर होण्यास मदत होईल, असा दावा सीतारामन यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरील भाषणात या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, अर्थमंत्रालायाने कृतिगट स्थापन करून विविध क्षेत्रांतील  तज्ज्ञांशी चर्चा केली. या सल्लामसलतीतून राष्ट्रीय पायाभूत विकास योजना बनवण्यात आली, असून ती २०२४-२५ पर्यंत सुरू राहील. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्राचा सहभाग असेल.

 पुढील पाच वर्षांमध्ये पायाभूत विकासासाठी १०२ लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल.

 •  वीज, रेल्वे, शहरी भागांतील जलसाठा, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख क्षेत्रात गुंतवणूक होईल.
 •  केंद्र व राज्ये प्रत्येकी ३९ टक्के तर खासगी क्षेत्र २२ टक्के गुंतवणूक करेल.
 •  प्रकल्पांचा आराखडा, माहितीची देवाणघेवाण, अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य व खासगी क्षेत्रांतील प्रतिनिधींची समन्वय समिती असेल.
 •  गेल्या पाच वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५१ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत.
 • राष्ट्रीय पायाभूत विकास योजनेची आखणी करण्यासाठी चार महिन्यांमध्ये विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी ७० चर्चा झाली़़़़़़़़़़़़़़़़़़़.
 •  १०० लाख कोटी २०२४-२५ पर्यंत विविध प्रकल्पांसाठी खर्च केले जातील.
 •  ४२ लाख कोटींचे प्रकल्प आधीच सुरू झाले आहेत. त्यात महामार्गाचा विकास, राष्ट्रीय वायू ग्रिड, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
 • ४२ टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली असून ३१ टक्के प्रकल्पांचे संकल्पचित्र तयार केले जात आहे.
 • बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आणि राजस्थानने गुंतवणुकीचा आराखडा केंद्राला अजून दिलेला नाही. १८ राज्ये या योजनेत सहभागी झाली आहेत.

पुढील पाच वर्षांत  १०२ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा आराखडा

गुंतवणूक कशी?(आकडे लाख कोटी)

 • सिंचन व ग्रामीण विकास- प्रत्येकी ७.७ .  त्यापैकी ओद्योगिक सुविधांचा विकास- ३.०७. रस्तेविकास- १९.६३, रेल्वेविकास- १३.६८, बंदरांचा विकास-१,
 • विमानतळ- १.४३, दूरसंचार- ११.७, शहरी सुविधा- १६.२९
 • ऊर्जा क्षेत्रासाठी २४.५४. त्यातील ११.७ वीज क्षेत्रासाठी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:25 am

Web Title: strengthen infrastructure projects akp 94
Next Stories
1 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद न थांबल्यास ‘प्रतिव्यूहात्मक कारवाई’
2 सुधारित नागरिकत्व कायद्यातील बदल रद्द करा!
3 ‘एअर इंडिया’चे खासगीकरणच!
Just Now!
X