लोकसभेच्या येत्या निवडणुकांमध्ये २७२+ जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघटनेला राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर सशक्त करण्याचे आदेश भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी राज्य पातळीवरील भाजप दिला आह़े  तसेच सर्व स्तरातील आणि सर्व वयोगटांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याबद्दलही कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आह़े
रविवारी भाजपचे केंद्रीय नेते आणि प्रदेशाध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस यांची येथे बैठक झाली़  देशातील वातावरण त्रीव कॉंग्रेसविरोधी आहे आणि प्रमुख विरोधी पक्षाचा एकच सक्षम पर्याय जनतेपुढे आहे, असे बैठकीनंतर भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी सांगितल़े
मोदी यांनी या वेळी पक्षाच्या निवडणूक प्रचार तंत्र कसे असायला हवे याबाबत मार्गदर्शन केल़े  मतदारांना मतदार केंद्रांवर आणणे किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला़  कार्यकर्त्यांनी हे आव्हान पेलावे असे आवाहन त्यांनी केल़े  तर पक्षाचा आधारस्थळ अधिक बळकट करण्याचे तसेच ते अधिक वाढविण्यास भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितल़े
तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणारा मतदार अस्वस्थ आह़े  त्यामुळे त्याला पक्षाकडे वळविण्याची गरजही मोदींनी या वेळी अधोरेखित केली़  पक्षाकडून स्थापन करण्यात आलेल्या २० उपसमित्यांना अधिक कार्यक्षम होण्याचे आदेश या वेळी जावडेकर यांनी या वेळी केल़े
लोकसभेत २७२+ जागा मिळविण्याचे आवाहन या वेळी राजनाथ सिंग यांनी केल़े  तसेच महागाई, रुपयाची घसरण आणि बेरोजगारी याबाबत त्यांनी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली़  राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रष्टद्धr(२२४)्नाावरही त्यांनी या वेळी शासनावर हल्लाबोल केला़