चीनमध्ये सध्या काटकसरीचे धोरण अवलंबण्यात आले असून अलीकडे २२ हजार अधिकाऱ्यांना या नियमाचे उल्लंघन केल्याने शिक्षा करण्यात आली आहे. २०१२ पासून १.२० लाख अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून उच्च पदस्थ व कनिष्ठ असा भेदभाव त्यात केलेला नाही. काटकसरीच्या नियमाचे उल्लंघन १७७६१ प्रकरणात झाले आहे.कम्युस्टि पार्टी ऑफ चायनाच्या केंद्रीय आयोगाने ही माहिती दिली आहे. नोकरशाहीला काटकसर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते, त्यात नियम तोडणाऱ्या ७१ हजार अधिकाऱ्यांना सरकारी वाहने वापरण्यास मर्यादा, लग्ने, अंत्यविधींवरील खर्चात कपात, अकारण अनुदानांना कात्री लावण्याचे आदेश सरकारने खूप आधीच दिले आहेत.पक्षातील हजारो अधिकारी व लष्करी अधिकाऱ्यांनाही शिक्षा करण्यात आल्या आहेत. क्षी जिनपिंग यांनी सूत्रे घेतल्यानंतर चीनमध्ये काटकसरीची भूमिका घेण्यात आली होती.