News Flash

श्रीनगरमध्ये अफवेमुळे निदर्शक रस्त्यांवर

श्रीनगरच्या वर्दळीच्या बटामालू भागात शनिवारी पोलिसांशी झालेल्या संघर्षांत एक नागरिक ठार

| April 24, 2016 12:06 am

श्रीनगरच्या वर्दळीच्या बटामालू भागात शनिवारी पोलिसांशी झालेल्या संघर्षांत एक नागरिक ठार झाल्याच्या अफवेमुळे चिडून रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.
बटामालू भागाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा कुठल्यातरी मुद्दय़ावरून एका पोलीस उपनिरीक्षकाशी वाद झाला व त्यातून भांडण उद्भवले. यात पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला जखमा झाल्या, तर नागरिक बेशुद्ध पडला. दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
या नागरिकाला नंतर ‘खबरदारीचा उपाय’ म्हणून एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आले व त्याची प्रकृती स्थिर आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 12:06 am

Web Title: strike in srinagar
Next Stories
1 संदीप पांडे यांच्या सेवासमाप्तीचा आदेश रद्द
2 हक्कानी गटावर कारवाई करण्यात पाकिस्तानची कुचराई चिंताजनक
3 अमेरिकेत दोन वेगळय़ा घटनांत १३ जणांची गोळय़ा झाडून हत्या
Just Now!
X