दोन दिवसांपूर्वी झालेल्या धुळीच्या वादळाचा तडाखा पुन्हा एकदा देशाच्या राजधानीला बसला आहे. त्याचबरोबर काही भागात पाऊसही बरसला, बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुन्हा हा वातावरणाचा बदल पहायला मिळाला आहे.

दिल्लीत बुधवारी पहाटे अचानकपणे प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. या वादळातील धुळीने संपूर्ण शहराला अक्षरशः कवेत घेतल्याचे चित्र होते. त्याचबरोबर येथील तापमानातही घट झाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

यापूर्वीही १३-१४ तारखेला देशातील पाच राज्यांना जीवघेण्या धुळीच्या वादळाने तडाखा दिला होता. यामध्ये ८० जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी हवामान खात्याने हे गडगडाटी वादळ पुढील ४८ ते ७२ तासांत पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली होती.

दरम्यान, २ मे रोजी देखील आलेल्या या जीवघेण्या वादळाने उत्तर भारतात आणि इतर राज्यांत १०० लोकांचे बळी घेतले होते.