News Flash

शिक्षिकेने वर्गात फरफटत नेल्याने विद्यार्थ्याचा हात मोडला

संबंधित शिक्षिकेला शाळा व्यवस्थापनाने निलंबित केले आहे.

संग्रहीत छायाचित्र

केरळमधील कोल्लम येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गापर्यंत फरफटत नेल्याने त्याचा हात मोडल्याची घटना समोर आली आहे. शिक्षिकेने बळजबरीने विद्यार्थ्याला फरफटत नेले आणि वर्गात बसवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्लममधील वालाथुंगल येथील गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकंडरी स्कूलमध्ये ही घटना घडली. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेबाबतचा अहवाल व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आल्यानंतर संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने वृत्तसंस्थेला दिली. पीडित विद्यार्थी वर्गातील विज्ञानाचा तास संपल्यानंतर इतर विद्यार्थ्यांसोबत आमच्याकडे आला होता. माझ्या हाताला खूप वेदना होत आहेत, असे त्याने सांगितल्याची माहिती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत चौकशी केली असता, शिक्षिकेने या विद्यार्थ्याला फरफटत नेले आणि जबरदस्ती वर्गात बसवले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यानंतर त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याचा हात मोडला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विद्यार्थ्याचा हात मोडल्याच्या आरोपाचे संबंधित शिक्षिकेने खंडन केले आहे. मी फक्त त्या विद्यार्थ्याला त्याच्या बेंचपर्यंत घेऊन गेली होती. कारण तो त्याच्या बेंचवर बसला नव्हता, असे तिने व्यवस्थापनाला सांगितले. शिक्षिकेने या कृत्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत मंगळवारी शाळेत जाऊन चौकशी केली. अद्यापही पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 8:04 pm

Web Title: student arm fractured after teacher allegedly drags him to class
Next Stories
1 रतन टाटांसाठीच जास्त पैसे खर्च झाले; सायरस मिस्रींचा पलटवार
2 केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीतच?
3 नोटबंदीवर राम माधव म्हणाले, कठीण समयीच लागते ‘देशभक्ती’ची कसोटी
Just Now!
X