News Flash

विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार; वर्गात रागवल्यामुळे घेतला सूड

गोळी खांद्याला घासून गेल्यामुळे शिक्षक थोडक्यात बचावले

(प्रातिनिधीक छायाचित्र)

विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं फार पवित्र मानलं जातं. विद्यार्थ्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान खुप महत्वाचे मानले जाते. शिक्षकांबद्दलच्या आदरापोटी आपण शिक्षकदिन साजरा करतो. परंतु बऱ्याचवेळा आपल्याला काही भलत्याच गोष्टी ऐकायला मिळतात.

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे असाच एक प्रसंग घडला. वर्गात सर्वांसमोर रागवल्यामुळे अपमान झाल्याने १७ वर्षीय मुलाने शिक्षकाविरोधात सूड उगवण्याची योजना आखली. सचिन त्यागी हे वाणिज्य शिक्षक सरस्वती विहार येथील कृष्णा विद्या स्कूल येथून मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी रागाने भरल्याने या विद्यार्थ्याने त्याच्या तीन मित्रांसह शाळेच्या आवारात त्यागींवर गोळ्या झाडल्या.

ग्रामीण पोलिस अधीक्षक इरज राजा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या तीन साथीदारांसह शिक्षकावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते शिक्षक जखमी झाले. गोळी त्यांच्या खांद्याला घासून गेली. राजा म्हणाले की, चारही तरुणांना आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या सहाय्याने ओळखले आहे.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, तर त्यांचे मोबाइल फोनवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसपी यांनी दिली. विद्यार्थ्यांविरोधात शिक्षकाने एफआयआर दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 11:16 am

Web Title: student opens fire at teacher outside school in up sbi84
Next Stories
1 तुमचा खेळ संपलाय; मोदींचा ममतांवर हल्ला
2 नवी चिंता… अमेरिकेतील नव्या करोना विषाणूवर लसही निष्प्रभ ठरण्याची वैज्ञानिकांना भीती
3 “राजघराण्याला बाळाच्या रंगाची चिंता होती”; मेगन मार्कलनं सांगितली ब्रिटीश राजघराण्यातील गुपितं
Just Now!
X