१८ डिसेंबर रोजी सुरू होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केली आहे. चेन्नईतील पावसामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परिक्षेच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत ती पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
तामीळनाडूतून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी चेन्नईत येतात. पावसामुळे मागील काही आठवडे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास वेळ मिळाला नाही. परिक्षेच्या तयारीसाठी या विद्यार्थ्यांना दोन महिने वाढवून मिळावेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या पत्रात मोदी यांना साकडे घातले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 14, 2015 5:12 am