हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थानिक नेता नंदनाम सुशील कुमार याने आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी सदस्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांसमोरच हा प्रकार घडल्याचे नंदनाम याने म्हटले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी नंदनाम याच्यासोबतच रोहित वेमुला याची वादावादी झाली होती. आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या आवारातच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला. हल्लेखोरांनी आपल्याला जबरदस्तीने माफी मागण्यास सांगितली, असेही त्याने वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. रोहितच्या आत्महत्येचा योग्य पद्धतीने तपास केला जावा आणि निष्पक्षपातीपणाने या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी नंदनाम सुशील कुमार याने केली.