स्वातंत्र्यपूर्व काळात फार कमी प्रमाणात महिला नोकरी करत होत्या. मात्र आता प्रत्येक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर महिला नोकरी करत असल्याने पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असा जावईशोध भाजपशासित छत्तीसगढच्या शिक्षण विभागाने लावला आहे. दहावीच्या समाजशास्त्र या विषयाच्या पाठय़पुस्तकामध्ये हा उल्लेख करण्यात आल्याने शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे. काँग्रेसने टीकेची झोड उठवल्यानंतर शिक्षण विभागाने हा उल्लेख वगळण्यात येणार असल्याची सारवासारव केली आहे.