16 December 2019

News Flash

सब लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट

नौदलाचे सर्वांत शक्तीशाली 'डोर्निअर सर्विलांस' या विमानाचे उड्डाण त्या करणार आहेत.

नवी दिल्ली : सब लेफ्टनंट शिवांगी यांना नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे.

सब लेफ्टनंट शिवांगी यांनी इतिहास रचला असून त्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत. कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या त्या कार्यरत आहेत. नौदलाचे सर्वांत शक्तीशाली विमान ‘डोर्निअर सर्विलांस’चे त्या उड्डाण करणार आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

नौदलात पहिली महिला पायलट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवांगी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “मी अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते त्यानंतर आज अखेर ही संधी मला मिळाली. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. मी आता आपल्या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे.

नौदलाच्या माहितीनुसार, सब लेफ्टनंट शिवांगी यांनी शॉर्ट सर्विस कमिशनद्वारे (एसएससी) २७व्या एनओसी कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यांत केरळच्या ऐझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीतून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्यांनी दीड वर्षे पायलटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दोन डिसेंबर रोजी शिवांगी यांची नौदलाची पहिली महिला पायलट म्हणून घोषणा करण्यात आली.

First Published on December 2, 2019 2:13 pm

Web Title: sub lieutenant shivangi today became the first naval women pilot aau 85
Just Now!
X