News Flash

पुढील दिवाळी राम मंदिरातच: सुब्रमण्यम स्वामी

त्या जागेवर पुजा करण्याचा माझा आणि हिंदू समाजाचा मुलभूत अधिकार आहे

सुब्रमण्यम स्वामी

अयोध्या येथे लवकरच राम मंदिरचे काम सुरू होणार असून पुढील दिवाळीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ते खुले होईल, असा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ‘रामराज्य’ यावर बोलताना त्यांनी येत्या दिवाळीपर्यंत राम मंदिर तयार झालेले असेल, असे म्हटले. दरम्यान, दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याला उद्या (सोमवार) २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

स्वामी म्हणाले, अयोध्यामध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार होण्याची शक्यता आहे. सर्व काही तयार आहे असून मंदिर निर्मितीसाठी आवश्यक सामानही तयार आहे. त्यांना फक्त स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडण्याचीच गरज आहे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी ५ डिसेंबरपासून सुनावणी सुरू होण्यापूर्वी स्वामी म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच या विषयावर गहन चर्चा केलेली आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डकडे मनाई करण्यास काही संधीच नाही, असे ते म्हणाले.

त्या जागेवर पुजा करण्याचा माझा आणि हिंदू समाजाचा मुलभूत अधिकार आहे, असे मी न्यायालयाला सांगितले आहे. मुस्लिमांकडे तो अधिकार नाही. त्यांचा रस फक्त संपत्तीत असून ते सामान्य आहे, असेही त्यांनी म्हटले. राम मंदिरच्या उभारण्यासाठी नव्या कायद्याची गरज नाही. आम्ही कायदा आणू शकतो. पण मला वाटतं याची गरज नाही. कारण आम्ही हा खटला जिंकत आहोत आणि मला तसा विश्वासही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:10 pm

Web Title: subramanian swamy claims to celebrate next diwali at ram temple
Next Stories
1 गुजरातमध्ये काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले; खा. राजीव सातव यांना अटक आणि सुटका
2 पाकिस्तानच्या राजकारणात हाफिज सईदची एन्ट्री; सार्वत्रिक निवडणूक लढवणार
3 प्रचारात शालीनता हवी!