रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची धोरणे देशासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिकागोला पाठवा, असे मत भाजपचे राज्यसभेतील सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी व्यक्त केले. गांधी घराण्यातील नेत्यांविरुद्ध बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी यांनी यावेळी थेट रघुराम राजन यांच्याविरच निशाणा साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
संसद भवनाबाहेर पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये स्वामी म्हणाले, रघुराम राजन यांची धोरणे देशासाठी अनुकूल नाहीत. त्यांच्यामुळे देशाचे नुकसान झाले असून, बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे उद्योगांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्याजदर वाढविल्याचाही परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पुन्हा एकदा शिकागोला पाठवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.