07 March 2021

News Flash

राजीव गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनियांना: सुब्रमण्यम स्वामी

सोनिया गांधींनी नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा खर्च उचलला आहे

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात विरोधी पक्षांनी 'भारत बंद' पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ आणि भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरावरून आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गांधी कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे. राजीव गांधी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत स्वामींनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला होता, असा दावा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नलिनीला मृत्यूदंड ठोठावला होता. त्यांनी (गांधी कुटुंब) राष्ट्रपतींना पत्र लिहून तिला आजीवन कारावास देण्याची मागणी केली. त्यांच्या (राहुल) वक्तव्यावरून संपूर्ण कुटुंबावर संशय येतो. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींना झाला होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, जेव्हा सर्वोच्च न्यायालय यावर विचार करत असेल आणि भारत सरकारने सक्त भूमिका घेतली असेल नेमके त्याचवेळी असे वक्तव्य करणे याचाच अर्थ त्यांचा एलटीटीईशी काही संबंध असू शकतो. कदाचित राजीव गांधी यांची हत्येसाठी सुपारी दिली असेल. याचा तपास केला पाहिजे. राजीव गांधी काय त्यांची ‘प्रॉपर्टी’ आहे का, असा सवाल करत ते देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाली.

वडिलांच्या मारेकऱ्यांची प्रियंका गांधी घेतलेल्या भेटीवरही स्वामींनी टीका केली. तुरूंगात फक्त नातेवाईकांना कैद्याशी भेटू दिले जाते. त्या कोणत्या नातेवाईक आहेत ? सोनिया गांधींनी नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आहे. त्यांच्यावर एवढी दया का दाखवली जात आहे ?

दरम्यान, सिंगापूर येथे बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण व बहीण प्रियंका गांधी यांनी वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 3:30 pm

Web Title: subramanian swamy on rahul gandhis statement on rajiv gandhi assassination blame on sonia gandhi and priyanka gandhi
Next Stories
1 काठमांडूजवळ विमान कोसळले, ५० प्रवाशांचा मृत्यू
2 जंगलात पेटलेल्या वणव्यात होरपळून नऊ ट्रेकर्सचा मृत्यू
3 पायाचे तुकडे पडूनही ८५ वर्षांच्या आजींनी पूर्ण केला किसान लाँग मार्च
Just Now!
X