News Flash

“कमला हॅरिस हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात, मोदींनी त्यांची खुशमस्करी करु नये”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

"चांगले मित्र राहिल्याबद्दल मोदींनी ट्रम्प यांचे मानावे आभार"

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : एपी आणि पीटीआय)

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. स्वामी यांनी ट्विटरवरुन केंद्र सरकारला इशारा देताना भारत सरकारने अमेरिकेमध्ये सत्तेत येणाऱ्या जो बायडेन यांच्या सरकारची खुशमस्करी करु नये, असं म्हटलं आहे. तसेच स्वामी यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात असल्याचेही म्हटले आहे.

“प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार अमेरिकेत बायडेन-हॅरिस यांच्या सरकारला (म्हणजेच सरकारमधील नेत्यांना) भारतामध्ये आमंत्रित केलं जाणार आहे. केंद्र सरकारने दोघांचीही खुशमस्करी करु नये. भारताशी संबंधित प्रकरणांमध्ये जो बायडेन हे कमला हॅरिस यांच्या माध्यमातून येतील आणि कमला हॅरिस या वैचारिक दृष्ट्या हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात म्हणजेच भाजपाच्या विरोधात आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर व्हावं,” असं ट्विट स्वामींनी केलं आहे.

स्वामी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. एका युझरने, “मला नाही वाटत कमला हॅरिस या हिंदू धर्माविरोधात आहेत. त्या उदारमतवादी आहेत. भारतामध्ये सर्व प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य आहे,” असं म्हटलं आहे. स्वामी यांनी हे ट्विट करण्याआधी रविवारी आणखीन एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनाच सल्ला दिला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (२० जानेवारी २०२१ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष असतील) यांना ट्विट करुन भारताचे चांगले मित्र झाल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. तसेच त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करावे,” असं म्हटलं आहे. “मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला संविधानानुसार असणारा मार्ग दाखवला आहे. मी एखाद्या घोड्यासाठी पाणी आणू शकतो मात्र त्याला पाणी पाजू शकत नाही,” असंही स्वामींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना शुभेच्छा देताना, भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करता येईल, असं म्हटलं होतं. या  शुभेच्छा देताना मोदींनी बायडेन यांच्याशी गळाभेट घेताना एक फोटो देखील शेअर केला होता. मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. तुमचे यश प्रेरणादायक आहे. हा केवळ तुमच्या नातलगांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील, अशी आशा मला आहे, असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 4:43 pm

Web Title: subramanian swamy says modi govt must be atmanirbhar and stop fawning on the new biden harris govt scsg 91
Next Stories
1 … म्हणून तरूणांसमोर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही – मेहबुबा मुफ्ती
2 बायडन कलम ३७०, ३५ अ पुन्हा लागू करण्यास दबाव आणतील; युथ काँग्रेसच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
3 जाता जाता… ट्रम्प चालणार शेवटची चाल; चीन मुद्द्यावरुन बायडेन यांना आणणार अडचणीत
Just Now!
X