28 February 2021

News Flash

चांद्रयान २ : चंद्रावर पाच एकरांचा प्लॉट विकत घेणाऱ्याच्या आशा पल्लवित

या व्यक्तीने २००३ साली अवघ्या १४० डॉलरमध्ये पाच एकरांचा भूखंड विकत घेतला होता.

चांद्रयान-२ (प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र)

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेला यशस्वीरित्या सुरुवात झाली. त्यामुळे आता १६ वर्षांपूर्वी चंद्रावर पाच एकरांचा प्लॉट विकत घेणाऱ्या एका भारतीय व्यक्तीच्या आपल्या हयातीत चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राजीव बागदी असे चंद्रावर पाच एकरांचा भूखंड विकत घेतलेल्या भारतीयाचे नाव आहे. या व्यक्तीने अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘लुनार सोसायटी इंटरनॅशनल’ या संस्थेकडून २००३ साली अवघ्या १४० डॉलरमध्ये पाच एकरांचा भूखंड विकत घेतला होता. दरम्यान, भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली याचा एक भारतीय म्हणून मला अभिमान आहे. ही मोहिम मानवासाठी मोठी कल्याणकारी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यूज १८ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बागदी म्हणतात, मला आशा आहे भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेमुळे चंद्रावरील पर्यटनाला २०३० पासून सुरुवात होईल. जेव्हा मी चंद्रावर एक प्लॉट विकत घेतला होता तेव्हा मी विचार केला होता की, माझ्या पुढच्या पिढीला याचा फायदा होईल. मात्र, आता माझ्या हयातीतच मी माझ्या कुटुंबासोबत चंद्रावर जाऊ शकतो, असे मला वाटते आहे.

इतरांप्रमाणे बागदी यांना लहानपणापासून चंद्राचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांनी याबाबत म्हटले की, मला माहिती नाही की मी चंद्राबाबत इतका जिज्ञासू का आहे. एकदा इंटरनेटवर सर्फिंग करीत असताना मी चंद्रावर भूखंड विकत घेण्याबाबत माहिती वाचली. त्यानंतर मी या जाहिरातीची पडताळणी केली आणि त्यानंतर चंद्रावर जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला. रितसर करार झाल्यानंतर बागदी यांना लुनार रिपब्लिककडून चंद्रावर जागा विकत घेतल्याची अधिकृत कागदपत्रे देण्यात आली. यामध्ये नोंदणीचा दावा आणि कराराचा समावेश आहे. तसेच यात चंद्राच्या नागरिकत्वाचा आणि नकाशाचाही समावेश आहे.

बागदींनी पुढे म्हटले की, माझ्याप्रमाणे लाखो लोकांनी चंद्रावर जागा विकत घेतली आहे. माझा चुलत भाऊ ललीत मोहाटा यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. जेव्हा मी चंद्रावर जमीन विकत घेतली तेव्हा लोक माझ्यावर हसत होते. ते मला मूर्ख आणि चंद्रासाठी वेडा झालेला माणून म्हणत होते. मात्र, आता ते लोक खोटं ठरत असल्याने मला आनंद होत आहे. काही दशकांपूर्वी आम्ही अमेरिकेत दाखल झालो. त्यानंतर आज बहुसंख्य भारतीयांच्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती अमेरिकेत गेला आहे. याच प्रकारे पुढील २० वर्षात चंद्राबाबतही असेच काहीसे घडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 1:09 pm

Web Title: successful chandrayaan 2 launch a five acre plot buyers have hopes he will be going on the moon aau 85
Next Stories
1 ‘माझी संपत्ती जप्त केली जाऊ नये’, मल्ल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
2 Man Vs Wild: पंतप्रधान मोदी झळकणार डिस्कव्हरी चॅनेलवर
3 फक्त ९ रुपयांचा हव्यास नडला! कंडक्टरने वेतनात गमावले १५ लाख
Just Now!
X