03 March 2021

News Flash

‘ध्रुवास्त्रा’ची चाचणी यशस्वी

बालासोर येथे १५ व १६ जुलैला त्याच्या हेलिकॉप्टरमधून सोडण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या.

संग्रहित छायाचित्र

 

ओडिशातील बालासोर येथे भारताच्या हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या ध्रुवास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून यात प्रत्यक्ष हेलिकॉप्टरमधून ते सोडण्यात आले नव्हते. हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात नाग (हेलिना) क्षेपणास्त्र आहे, त्याचे नामकरण ‘ध्रुवास्त्र’ असे करण्यात आले आहे. भारतीय लष्करी दलांनी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून  बालासोर येथे १५ व १६ जुलैला त्याच्या हेलिकॉप्टरमधून सोडण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या.

‘हेलिना’ हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मूळ उद्देश शत्रूच्या रणगाडय़ांचा वेध घेणे हा आहे. प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून ते सोडता येते. सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र असून उंचीवरून हल्ला व थेट हल्ला असे दोन्ही प्रकार यात शक्य आहेत. हेलिना शस्त्रास्त्र प्रणाली अजून लष्करात तैनात करण्यात आलेली नाही. हेलिनाचाच भाग असलेले ध्रुवास्त्र भारतीय हवाई दलात तैनात करण्याचे काम चालू आहे. या क्षेपणस्त्राची क्षमता ७ कि.मी. असून एकाच वेळी हेलिकॉप्टरला लावून आठ क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात. त्यासाठी दोन प्रक्षेपकांचा वापर केला जातो. हेलिना दोन प्रकारे सोडता येते. रणगाडय़ांची जास्तीत जास्त हानी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यात ‘इमेजिंग इन्फ्रारेड सिकर’चा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:29 am

Web Title: successful dhruvastra test abn 97
Next Stories
1 राज्यात चोवीस तासांत १० हजार रुग्णवाढ
2 अमेरिकी उद्योगांना मोदींचे निमंत्रण
3 लडाखमध्ये हवाई दलाच्या तैनातीने चीनला योग्य संदेश
Just Now!
X