26 January 2021

News Flash

अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी

मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ २७ दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

 

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे. महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व  ३० नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.

ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती. वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला. मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ २७ दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे २०२१ मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.

आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे. अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ  कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने  प्रयोग केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 12:12 am

Web Title: successful radish planting in the space station abn 97
Next Stories
1 विरोधक मैदानात!
2 भारतातही लसवापरासाठी ‘फायझर’चा अर्ज
3 ब्रिटनमध्ये सर्वात मोठे लसीकरण, सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ 
Just Now!
X