डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हवाई दलासाठी विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-१ या रेडिओलहरीवेधी क्षेपणास्त्राची शुक्रवारी सुखोई-३०द्वारे ओदिशातील बालासोर तळावरून यशस्वी चाचणी केली.

रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचीवर डागले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकेत अथवा  लहरी पकडण्यासाठीही हे क्षेपणास्त्र तत्पर आहे. या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरता येऊ शकते.

रुद्रम-१ची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यामध्ये काही बदल अपेक्षित असल्याने त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली.  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.