हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) गुरुवारी हॉक-आय विमानातून स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीच्या यशामुळे स्वदेशी हॉक-आय कार्यक्रमाला गती मिळणार आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. एचएएलचे टेस्ट पायलट निवृत्त विंग कमांडर पी. अवस्थी आणि निवृत्त विंग कमांडर एम. पटेल यांनी हॉक-आय मधून SAAW हे अस्त्र डागले.

मोहिमेची सर्व उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे एचएएलकडून सांगण्यात आले. दूर अंतरावरुन हे अस्त्र डागून शत्रूच्या ठिकाणांचा वेध घेता येऊ शकतो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) हे शस्त्र विकसित केले आहे. पहिल्यांदाच भारतीय हॉक-Mk132 मधून हे स्मार्ट शस्त्र डागण्यात आले. १२५ किलो वर्गातील SAAW हे अत्याधुनिक, अचूकतेने वार करणारे शस्त्र आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

SAAW चा वापर करुन, १०० किमीच्या परिघातील शत्रूची धावपट्टी, रडार आणि बंकर उद्धवस्त करता येतात. याआधी जॅग्वार फायटर जेटमधून SAAW ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून हॉक-आय विमानांची निर्मिती केली जाते. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी या विमानांचा वापर केला जातो. आता शस्त्र डागण्यासाठी हॉक-आयचा वापर करुन, या विमानांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने संरक्षणासह सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारतावर भर दिला आहे. एचएएलचे उद्दिष्टय सुद्धा तेच आहे.