पेशावरमधील एका कनिष्ठ न्यायालयात घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १४ जण मृत्युमुखी पडले, तर २६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये न्यायालयाच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
चारसद्दा जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने स्वतःभोवती स्फोटके लावली होती. सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर गर्दीच्यावेळीच स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे अनेक जण जखणी झाले. स्फोटके घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी हेरले होते, पण त्याला अटक करेपर्यंत त्याने स्फोट घडवून आणला.
स्फोटानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, अन्य कोणी दहशतवादी लपून बसला आहे का, याचा शोध घेण्यात येतो आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.