06 July 2020

News Flash

रावळपिंडीतील हल्ल्यात १३ ठार

पाकिस्तानातील लष्कराचा बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावळपिंडी शहरात सोमवारी तालिबान्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा सैनिकांसह १३ जण ठार झाले तर इतर २४ जण

| January 21, 2014 01:57 am

पाकिस्तानातील लष्कराचा बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावळपिंडी शहरात सोमवारी तालिबान्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा सैनिकांसह १३ जण ठार झाले तर इतर २४ जण जखमी झाले. रविवारी बानू जिल्ह्य़ातील छावणी भागात झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात २० सैनिक ठार झाल्यानंतर आज लागोपाठ  दुसरी घटना घडली आहे. आत्मघाती बॉम्बर सायकलवर आला व त्याने बाजारपेठ भागात एका लष्करी जवानास मागे सारून तो लष्कराच्या मुख्यालयात घुसला, इतर लष्करी आस्थापनांमध्येही तो गेला. नंतर त्याने स्फोटात स्वत:ला उडवून दिले. लष्करी मुख्यालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर बाजारपेठ आहे व तो शहरातील सर्वात सुरक्षित भाग मानला जातो असे पोलिस प्रमुख अख्तर हयात लालिका यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2014 1:57 am

Web Title: suicide bomber kills 13 near pakistan army hq in rawalpindi
Next Stories
1 आंदोलन सोपे, नेतृत्त्व सिद्ध करून मार्ग काढणे महत्त्वाचे- दिग्विजय सिंह यांचा केजरीवाल यांना टोला
2 मच्छिमार हत्येप्रकरणी इटलीतील नाविकांवर लवकरच आरोपपत्र
3 मोदींचे इंद्रधनू!
Just Now!
X