पाकिस्तानातील पेशावरमध्ये पोलिस व्हॅनजवळ करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात सहा जण ठार, तर ४० जण जखमी झालेत. पेशावरमधील विद्यापीठ रस्त्यावर सोमवारी सकाळी हा स्फोट घडविण्यात आला.
आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी मोटारसायकलवरून आला होता. त्याच्याकडे डिटोनेटर्स आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. रस्त्यावरील पोलिस व्हॅनजवळ त्याने स्फोट घडवून आणला. पोलिस व्हॅन ही रस्त्यावरील एका बसस्थानकाजवळ उभी होती. स्फोट घडवून आणला त्यावेळी तेथून गर्दीने भरलेली एक बस निघाली होती. बसमधील प्रवासी या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 1:15 am