News Flash

तामिळनाडू: बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय सुजित विल्सनचा मृत्यू

या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न तीन दिवस सुरु होते

तामिळनाडूतील त्रिचुरापल्ली जिल्ह्यात एका बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. २५ ऑक्टोबर रोजी तो बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आला आहे. सुजित विल्सन असं मुलाचं नाव होतं. त्याचा मृतदेह अत्यंत विघटीत अवस्थेत होता असं तामिळनाडूच्या आयुक्तांनी सांगितलं.

सुजित विल्सन हा दोन वर्षांचा मुलगा खेळता खेळता ६०० फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. शुक्रवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. तेव्हापासून त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्याला जिवंत बाहेर काढण्यात कुणालाही यश आलं नाही. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. मी सुजित विल्सनच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

शुक्रवारी संध्याकाळपासून म्हणजेच हा दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यापासून या मुलाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र यामध्ये कुणालाही यश आलं नाही. या मुलाचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो मृतदेह विघटन झालेल्या अवस्थेत होता त्याचे तुकडेही झाले होते असंही आयुक्तांनी सांगितलं. सुजितचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. आज सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 9:13 am

Web Title: sujith wilson dies in borewell official says body in highly decomposed state scj 81
Next Stories
1 दिल्लीची हवा गुणवत्ता पातळी यंदा चांगली
2 बगदादीचा संभाव्य वारसदारही ठार
3 एका महिन्यात तीन आत्महत्या
Just Now!
X