News Flash

भारतासाठी हा खरंच काळा दिवस; अकाली दलानं व्यक्त केला संताप

राष्ट्रपतींच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी

सुखबीर सिंग बादल. (छायाचित्र-एएनआय)

मोदी सरकारच्या प्रस्तावित तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. या विधेयकांवरून मतभेद झाल्यानं पंजाबमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एनडीएमधूनही शिरोमणी अकाली दल बाहेर पडला. आज राष्ट्रपतींनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली. त्यानंतर अकाली दलानं राष्ट्रपतींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत नव्या कायद्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. आज तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून, तिन्ही विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे.

विधेयकांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर शिरोमणी अकाली दलानं संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. “राष्ट्रपतींनी देशाच्या विवेकहिताच्या दृष्टीनं कृती करण्यास नकार दिला असून, भारतासाठी हा खरंच काळा दिवस आहे. शिरोमणी अकाली दल आणि इतर काही विरोधी पक्षांना आशा होती की ही विधेयक फेरविचार करण्यासाठी संसदेकडे पाठवली जातील,” असं म्हणत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुखबीर सिंह बादल यांनी ही विधेयकं संसदेत मांडण्यापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शनिवारी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सरकारच्या तिन्ही विधेयकांना विरोध दर्शवला आहे. सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी शेतकरी, शेतमजूर व शेती व्यापाऱ्यांच्या हितांचं रक्षण करावं. अकाली दल आपल्या आदर्शांपासून दूर जाणार नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही एनडीएतून बाहेर पडत आहोत, असं म्हणत भाजपाची साथ सोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 7:46 pm

Web Title: sukhbir singh badal agriculture law modi governemt narendra modi president kovind bmh 90
Next Stories
1 कर्नाटक : रस्ते अपघातात गर्भवती महिलेसह ७ जणांचा मृत्यू
2 राष्ट्रपतींची तिन्ही कृषी विधेयकांवर मोहोर; झाले कायद्यात रुपांतर
3 ‘सिरम’चे अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक, म्हणाले…
Just Now!
X