पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेस हायकमांडकडून या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. तसेच अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु हे पंजाबचे पुढील उपमुख्यमंत्री असतील. तर, अरुणा चौधरी या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतील असं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, राहुल गांधी आणि अंबिका सोनी विधानसभेतील काँग्रेस नेते आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी भेटीसाठी वेळ मागितल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

अमरिंदर सिंग यांचा राजीनामा..

पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. तर राजीनामा देण्यापूर्वी सिंग यांनी गांधी यांना पत्र लिहिलं असल्याचंही आता समोर आलं आहे.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Devendra Fadnavis On Congress
“…पण पोपटांनो हे लक्षात ठेवा”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला इशारा
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही तासांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात गेल्या पाच महिन्यांच्या राजकीय घडामोडींमुळे दुःखी असल्याचे जाहीर केले. या पत्रात सिंग यांनी म्हटलं आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कडव्या हल्ल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या राजकीय घडामोडी पंजाबच्या समस्या आणि राज्याच्या गरजांवर आधारित नाहीत हेही सिंग यांनी अधोरेखित केले आहे.