News Flash

पंधरा हजार बाळंतपण करणा-या अम्माचं निधन

२०१८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

कर्नाटकातील मागास भागात जननी अम्मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या ९८ वर्षांच्या होत्या. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय सुखरूप बाळंतपण करण्यासाठी त्यांची ओळख होती. सुलागिट्टी नरसम्मा यांनी तब्बल पंधरा हजार महिलांचं सुखरूप बाळंतपण केलं आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात सुलागिट्टी नरसम्मा यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात तब्बल पंधरा हजार महिलांचे बाळंतपण केली. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय त्या हे काम करायच्या, त्यामुळे कर्नाटकच्या मागास आणि दुर्गम भागात त्यांना जननी अम्मा या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून तुमकूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानद पदवी दिली होती. याचबरोबर अनेक संस्थांच्या वतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

सुलागिट्टी नरसम्मा यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 9:40 pm

Web Title: sulagitti narasamma passes away at age of 98
Next Stories
1 Video : अंतराळात १९७ दिवस व्यतीत केल्यानंतर अंतराळवीराला पृथ्वीवर चालणं अवघड
2 त्यांनी अवघ्या १० हजार रुपयांमध्ये केलेलं लग्न ठरतयं चर्चेचा विषय
3 अन् पाकिस्तानच्या पत्रकाराने गाढवावरून केलं रिपोर्टिंग
Just Now!
X