तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला असून त्यासंदर्भात शहा यांनी स्वत: अथवा आपल्या वकिलामार्फत २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे, असे समन्स पश्चिम बंगालमधील विशेष न्यायालयाने शुक्रवारी शहा यांच्यावर बजावले आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी बदनामीचा आरोप केला आहे त्याला उत्तर देण्यासाठी शहा यांनी स्वत: किंवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहणे गरजेचे आहे, असे न्यायमूर्तीनी म्हटले आहे. शहा यांनी ११ ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत बॅनर्जी यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते, असा दावा बॅनर्जी यांच्या वकिलांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:13 am