अ‍ॅडमिरल रॉबिन धोवन यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या नौदल उपप्रमुखपदी व्हाइस अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालया’चे माजी विद्यार्थी असलेले लांबा यांनी नौदलातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.
रॉबिन धोवन यांच्याकडे २०१६पर्यंत नौदलप्रमुखपदाचा कार्यभार असणार आहे. २०१६मध्ये लांबा नौदलप्रमुखपदाच्या शर्यतीत असतील. त्यामुळे त्यांना आता उपप्रमुखपद देण्याची शक्यता आहे. पूर्व विभागाचे कमांडर व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांना मुंबईस्थित पश्चिम विभागाचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे. चोप्रा यांच्या जागी पूर्व विभागाचे कमांडरपद व्हाइस अ‍ॅडमिरल सतीश सोनी यांना मिळण्याची शक्यता आहे. सोनी यांच्याकडे सध्या दक्षिण विभागाचा कार्यभार आहे.