सीएसटी १०० स्टारलायनर अवकाशयानाद्वारे नासाची अंतराळमोहिम

द नॅशनल अरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा ही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था बोइंग कंपनीच्या सीएसटी १०० स्टारलायनर या अवकाशयानाच्या मदतीने सुनीता विल्यम्ससह चार अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात पाठवणार आहे. नासाची गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच समानव अवकाश मोहीम असणार आहे. कारण स्पेसशटल अवकाशयाने याआधीच बंद करण्यात आल्याने रशियाच्या मदतीने अवकाशवीर अंतराळ स्थानकात जात होते.

Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

आता सीएसटी १०० स्टारलायनरच्या मदतीने अवकाशात जाण्यासाठी संगणकीय सादृश्यीकरण चाचण्या घेतल्या जात असून त्यात अवकाश प्रवास प्रशिक्षकांपेक्षाही चांगली तयारी करून घेतली जाते व काही अवघड प्रसंग आल्यास काय करता येईल याचे प्रशिक्षण दिले जाते असे सुनीता विल्यम्स हिने म्हटले आहे. सॉफ्टवेअर बदलून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो व नंतर तेच सॉफ्टवेअर मोठय़ा सादृश्यीकरण यंत्रात लावले जाऊ शकते व सर्व अवकाशवीरांना प्रशिक्षण देता येते किंबहुना त्याचा वापर करता येतो असे तिने सांगितले. विशेष म्हणजे सिम्युलेटरवर अभ्यास करण्यासाठी सुनीताचीच पहिली निवड करण्यात आली आहे.

सीएसटीस १०० स्टारलायनर यानातून प्रवास करण्यासाठी आधी खूप प्रशिक्षण व पूर्वतयारी यांची गरज आहे. सर्व शक्यता गृहित धरून यात प्रशिक्षण दिले जाते. नासाने त्यासाठी सुनीता विल्यम्स, बो, बॉब बेनकेन व डो हल्रे यांची निवड केली आहे. त्यांना स्पेस एक्स ड्रॅगनचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या चौघांना अवकाश स्थानकात गेल्यानंतरची नेमकी कामगिरी अजून नेमून दिलेली नाही, पण सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत कारण बोइंगच्या नव्या अवकाशयानाने जाणारा हा पहिलाच अवकाश स्थानक चमू असेल. सादृश्यीकरण प्रशिक्षणासाठी काही प्रशिक्षक यूस्टनला नासाच्या जॉनसन स्पेस सेंटर येथे आले आहेत. अवकाश स्थानकाकडे जाताना जोखमीची परिस्थिती आल्यास काय करायचे किंबहुना निर्णय कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण यात महत्त्वाचे असते. सादृश्यीकरणाने प्रशिक्षण हे अवकाशवीरांसाठी नवीन नाही. बोइंगच्या अवकाश वाहन प्रशिक्षण मोहिमेचे प्रकल्प व्यवस्थापक पीट मेसिंगर यांनी सांगितले की, सेंट लुईस येथे बोईंगची प्रशिक्षण सुविधा आहे तेथेही या अवकाशवीरांना प्रशिक्षण दिले जाईल. सादृश्यीकरण यात महत्त्वाचे असते त्यांना पहिल्यांदा एकेकटय़ाने प्रशिक्षण दिले जाईल. अवकाशवीरांचा अभ्यास हा वेगवेगळ्या यंत्रणा चालवण्या संदर्भात आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना प्रगत यंत्रणांचा सराव दिला जाईल, सगळ्या मोहीम नियंत्रण चमूला नंतर पुन्हा एकत्र आणून प्रशिक्षण दिले जाईल कारण यात शेवटी सांघिक बाबींनाही बरेच महत्त्व असते.