22 October 2020

News Flash

sunjuwan army camp attack : महिला आणि मुलांना वाचवताना जेसीओ एम.अशरफ मीर शहीद

उधमपूर भागातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पॅरामिलिटरी कमांडोही शर्थीचे प्रयत्न सुरु

जम्मू- पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाल्यांनंतर संपूर्ण देशात याविषयीचे पडसाद पाहायला मिळाले. दहशतवादाचा लढा देण्यासाठी सध्या भारतीय सेनेच्या जवानांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु असून, दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यदलातील दोन जवानाच्या प्राणांची आहूतीही द्यावी लागली आहे.

दहशतवादी कारवाईला चोख उत्तर देण्यासाठी पॅरामिलिटरी कमांडोही शर्थीचे प्रयत्न करत असून ही कारवाई अखेरच्या टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये प्रचंड सावधगिरी बाळगण्यात आली असली तरीही महिला आणि लहान मुलांचा जीव वाचवताना जेसीओ एम.अशरफ मीर यात शहीद झाले आहेत.

दरम्यान, दहशतवाद्यांपासून स्थानिकांचे प्राण वाचवत असताना एकूण सहाजण जखमी झाल्याचेही कळत आहे. सुंजवामध्ये सध्या ही कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, आता सैन्यदलाच्या तळात तीन आतंकवादी असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : ‘रोहिंग्या, बांग्लादेशींचा वाढता वावर सुंजवा लष्करी हल्ल्यास जबाबदार?’

शनिवारी पहाटे हा हल्ला असून, लष्कराचे अधिकारी एस डी सिंग जमवाल यांनी याविषयीची माहिती दिली. ‘पहाटे ४.५५ च्या सुमारास संशयास्पद हालचाल दिसून आली आणि अचानक एका बंकरवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला’, असे ते म्हणाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेविषयी अधिक सतर्कता पाळण्यात येत असल्याचे लक्षात येत आहे. त्याशिवाय उधमपूर भागातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 4:28 pm

Web Title: sunjuwan army camp terrorist attack army briefs media says one jco martyred six others injured
Next Stories
1 ‘खोटी स्वप्ने दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेऊन उपयोग नाही’
2 औरंगजेब दहशतवादी होता: भाजपा खासदार महेश गिरी
3 सुंजवा लष्करी तळ हल्लाप्रकरण: जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
Just Now!
X