भारतीय वंशाच्या करिश्मा बन्सल यांचे संशोधन

एकमेकांभोवती फिरणारी दोन जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे शोधण्यात यश आले असून, ती पृथ्वीपासून ७५० प्रकाशवर्षे दूर आहेत. या संशोधनात करिश्मा बन्सल या भारतीय महिला वैज्ञानिकाचा समावेश आहे. गुरुत्वीय लहरी कशा तयार होतात यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक चमूने आइनस्टाइनने केलेले गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत खरे असल्याचे सिद्ध केले होते.

गुरुत्वीय लहरी या दोन कृष्णविवरांच्या टकरीतून तयार होतात. तीस सौर वस्तुमानाच्या दोन कृ ष्णविवरांची टक्कर झाल्याचे आताचे संशोधन असून, यात गुरुत्वीय लहरी तयार झाल्या आहेत. यातून दीíघकेची निर्मिती कशी होते व त्यात कृष्णविवरे कोणती भूमिका पार पाडतात याची माहिती मिळू शकते.

अमेरिकेतील न्यू मेक्सिको विद्यापीठाचे प्राध्यापक ग्रेग टेलर यांनी सांगितले, की बराच काळ आम्ही अवकाशात या कृष्णविवरांचा वेध घेत होतो. दोन दीíघकांच्या विलीनीकरणामुळे ही कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरत होती. असे घडते हे माहीत असले तरी त्याचा दृश्य पुरावा कुणाकडे नव्हता, तो आम्ही आता दाखवून दिला आहे. दोन कृष्णविवरांच्या आंतरक्रियेचा बारा वर्षे अभ्यास करण्यात आला. डॉ. टेलर यांनी मला यातील माहिती दिली व त्यानंतर आम्ही या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असे करिश्मा बन्सल यांनी सांगितले.

‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. २००३ पासून या कृष्णविवरांची माहिती उपलब्ध आहे व ते एकमेकांभोवती फिरत आहेत ही वेगळी घटना होती. अमेरिकेतील दहा रेडिओ दुर्बिणींनी या घटनेचा अभ्यास करण्यात आला व त्यात वेगवेगळय़ा कंप्रतेच्या रेडिओ लहरींचा वेध घेतला. या लहरी अतिजास्त वस्तुमानाच्या या कृष्णविवरांकडून आलेल्या होत्या. नंतर या कृष्णविवरांचा मार्गही ठरवता आला. ०४०२ प्लस ३७९ नावाची दीर्घिका ७५० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे. या दोन कृष्णविवरांचे एकूण वस्तुमान सूर्याच्या १५ अब्ज पट असून ते १५ अब्ज सौर वस्तुमानाइतके आहे. त्यांची कक्षा एवढी मोठी आहे, की एकमेकांभोवती फिरण्यास २४ हजार वर्षे लागतात.

सध्या देवयानी दीíघका आपल्या आकाशगंगेशी टक्कर होण्याच्या स्थितीत असून, तेथेही कृष्णविवरे आहेत. काही अब्ज वर्षांतून एकदा दीर्घिकांची एकमेकांशी टक्कर होत असते.