News Flash

‘क्वाड’ देशांकडून एक अब्ज लशींचा पुरवठा

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांनी क्वाड गटाची पहिली आभासी बैठक घेतली होती.

आग्नेय आशियातील देशांना फायदा

क्वाड देश आग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लशींचा पुरवठा करणार आहेत. भारतासह काही देशांमध्ये दुसरी लाट आली असून इतर काही देशांतही अजून करोना ओसरलेला नाही.

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांनी क्वाड गटाची पहिली आभासी बैठक घेतली होती. आता या गटाने आग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लशी पुरवण्याचे ठरवले आहे. या लशी भारतात तयार करण्यात येणार होत्या पण त्याचवेळी भारतात दुसरी लाट सुरू झाल्यामुळे भारताकडून लशी मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी क्वाड गटातील देश २०२२ पर्यंत तरी त्यांचे आश्वासन पूर्ण करणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.

व्हाइट हाऊसचे भारत प्रशांत विभाग धोरण सल्लागार कुर्त कॅम्पबेल यांनी सांगितले, की आम्ही आमच्या भागीदार देशांशी चर्चा करीत आहोत. भारताच्या मित्र देशांना हा कठीण काळ आहे. अमेरिका सध्या भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून सरकारी व खासगी क्षेत्राचा याला पाठिंबा आहे. खासगी क्षेत्रातील व्यक्तींशी तसेच सरकारी गटांशी चर्चा करण्यात आली असून २०२२ पर्यंत तरी लस उपलब्ध केली जाईल.

‘सेंटर फॉर न्यू अमेरिकेन सिक्युरिटी’ या वॉशिंग्टन येथील गटाने आयोजित केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले, की आग्नेय आशियातील देशांना लस मिळवून देण्यासाठी कमी काळात वेगाने प्रयत्न करावे लागणार आहेत. आशियात नव्हे तर जगातच विषाणूचे नवे प्रकार येत असून धोका कायम आहे. सामाजिक अंतर, मुखपट्टी हे उपाय करूनही ते पुरेसे ठरताना दिसत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:02 am

Web Title: supply billion vaccines from quad countries akp 94
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये नदीत बुडून ५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू
2 भारत आणि थायलंड यांच्या नौदलांची संयुक्त गस्त
3 नियमाधिष्ठित व्यवस्था चीनकडून धोक्यात येण्याची शक्यता
Just Now!
X