टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाची अमेरिकेत दखल घेण्यात आली आहे. काही अमेरिकन खासदारांनी अमेरिकन सरकारला भारतासारखाचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे. हे चिनी शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे या सदस्यांचे मत आहे.

टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेला, सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत असल्यामुळे भारताने सोमवारी ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. यामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉकसह युसी ब्राऊर्सरचा समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा- अमेरिकेचाही चीनला दणका; ‘या’ चिनी कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची केली घोषणा

काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य रिक क्रॉफर्ड यांनी टिकटॉक बंद झाले पाहिजे असे म्हटले आहे. मागच्या आठवडयात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीन सरकार आपल्या फायद्यासाठी टिकटॉकचा वापर करते असा आरोप केला होता. अमेरिकेत टिकटॉकचे ४ कोटी वापरकर्ते आहेत. अनेक तरुण मुले-मुली टिकटॉकचा वापर करतात. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- चिनी अ‍ॅपची वकिली करणार नाही, TikTok ची केस घेण्यास मुकुल रोहतगी यांचा नकार

बेरोजगार होणाऱ्या लोकांचं काय? नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल

चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केले आहेत.

“टिकटॉक हे एक मनोरंजन करणार अ‍ॅप आहे. हा एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे. धोरणात्मक योजना काय आहे? यामुळे बेरोजगार होणाऱ्या लोकांचं काय? नोटबंदीसारखंच लोक त्रासून जातील. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. पण, निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार?,” असा सवाल जहाँ यांनी मोदी सरकारला विचारला आहे.