News Flash

काँग्रेस कार्यकर्त्यांचे गुजरात विजयासाठी दिल्लीत हवन

राहुल गांधी यांच्या घरासमोर हवन सुरु

फोटो सौजन्य-एएनआय

गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकालांचे कल यायला सुरुवात झाली आहे. अशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये T20 चा एखादा सामना रंगतो आहे असेच चित्र आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला निकालांचे कल आणि आघाडी बदलत आहेत. मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवन सुरू केले आहे. दिल्लीत राहुल गांधी यांच्या घरासमोर हवन सुरु करण्यात आले आहे. दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर सुरु असल्याचेच दिसून येते आहे. अशात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी आपल्या परिने तयारी सुरु केली आहे.

गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी त्यांचा करीश्मा दाखवत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकण्याचे काम केले. राहुल गांधींना काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. आता त्यांच्यासमोर काँग्रेसचे वर्चस्व देशभरात पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान समोर आहे. नोटाबंदी, जीएसटी या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपला आपल्या भाषणांमध्ये लक्ष्य केले. आता मतपेटीतून नेमके काय बाहेर येते ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सगळ्या एग्झिट पोल्सनी भाजपच्या बाजूने कल दिला आहे. अशात दोन्ही पक्षांमध्ये आघाडी घेताना तरी काँटे की टक्कर दिसून येते आहे. राहुल गांधी यांची रणनीती यशस्वी झाल्याचेच यातून दिसून येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 9:26 am

Web Title: supporters perform hawan outside congress president rahul gandhis residence in delhi
Next Stories
1 Gujarat Election Results: गुजरात निवडणुकांचे १२ महत्त्वाचे फॅक्टर्स
2 Gujarat election results 2017: गुजरातमध्ये पुन्हा कमळच, काँग्रेसकडून कडवी झुंज
3 Himachal Pradesh Elections results 2017: काँग्रेसचा पराभव, भाजपला स्पष्ट बहुमत
Just Now!
X