26 October 2020

News Flash

Supreme Court Aadhaar card verdict: बँक खाते, मोबाईल नंबर व शाळांमधील आधारसक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय

Supreme Court Aadhaar Card Verdict: सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी आधारची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेत प्रवेश घेतानाही आधार सक्ती करता येणार नाही.

Supreme Court Aadhaar Card Verdict: बँकेत खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, भ्रमणध्वनी सेवा तसेच शाळांमधील प्रवेश, 'नीट' व अन्य परीक्षांसाठीही आधारसक्ती करण्यात आली होती.

Supreme Court Aadhaar Card Verdict: आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी ‘आधार’ची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेतील प्रवेशासाठीही ‘आधार’ सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

आधारकार्डच्या वैधतेबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. बँकेत खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, भ्रमणध्वनी सेवा तसेच शाळांमधील प्रवेश, ‘नीट’ व अन्य परीक्षांसाठीही आधारसक्ती करण्यात आली होती. ‘आधार’मुळे खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही असे स्पष्ट करत कोर्टाने मोबाईल, बँक खाते आधारशी जोडणे बंधकारक नसल्याचे नमूद केले. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा, ‘नीट’  व अन्य परीक्षांसाठीही आधारची सक्ती करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. घुसखोरांनाही आधार कार्ड देऊ नये, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

जाणून घ्या कल्याणकारी योजनांमधील आधारसक्तीबाबत काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने

 आधार विधेयकाला राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही!

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. न्या. ए. के. सिकरी, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. अशोक भूषण यांचाही घटनापीठात समावेश आहे. चार विरुद्ध एक अशा मताने हा निर्णय देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 11:47 am

Web Title: supreme court aadhaar card verdict board examination mobile phones bank accounts linking
Next Stories
1 रोजगार कशाला म्हणतात याची राहुल गांधींना माहितीच नाही, गिरिराज सिंह यांचा टोला
2 Supreme Court Aadhaar card verdict: ‘आधार’च्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब
3 मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध, VHP कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवलेल्या तरुणीला पोलिसांची मारहाण
Just Now!
X