07 March 2021

News Flash

राफेलच्या पुनर्विचार याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेसह इतर सर्व पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करणार आहे.

राफेल प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. खुल्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेसह इतर सर्व पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करणार आहे.


राफेल डील प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसेच वरिष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी या पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. या तिघांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, सरकारकडून सहीविना देण्यात आलेल्या बंद लिफाफ्यातील चुकीच्या माहितीच्या आधारे सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला होता. तर तिसरी पुनर्विचार याचिका आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी अॅड. धीरज सिंह यांच्यामार्फत १४ डिसेंबर रोजी दाखल केली होती.

यापूर्वी सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ऱाफेल डीलप्रकरणी धोरण प्रक्रिया, किंमत आणि विमान बनवणाऱ्या भागिदाराची निवड या तीन मुद्द्यांवर निर्णय दिला होता. यामध्ये सरकारच्या धोरण प्रक्रियेवर आक्षेप घेता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 6:27 pm

Web Title: supreme court allows open court hearing on rafale review petitions
Next Stories
1 Surgical Strike 2: शोभा डे म्हणतात…
2 पाकने आपल्या हद्दीतील दहशतवादी गटांवर तत्काळ कारवाई करावी : ऑस्ट्रेलिया
3 भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेले ‘हे’ ट्विट झाले व्हायरल
Just Now!
X